देवनारमधल्या रहिवाशांचा पालिका कार्यालयावर मोर्चा

 Mumbai
देवनारमधल्या रहिवाशांचा पालिका कार्यालयावर मोर्चा

देवनार - रफिकनगर परिसरातल्या झोपडपट्ट्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा तिथल्या रहिवाशांनी विरोध केलाय. शुक्रवारी परिसरातील रहिवाशांनी पालिकेच्या एम पूर्व कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पालिका पर्यायी व्यवस्था करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. गुरुवारी २० झोपड्यांवर पालिकेच्या एम पूर्व कार्यालयामार्फत तोडक कारवाई करण्यात आली होती. मात्र पालिकेने कुठल्याही प्रकारची पूर्वसुचना न देताच ही कारवाई केल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आलाय.

Loading Comments