सहारनपूर हिंसेच्या विरोधात आझाद मैदानात निदर्शने

 Azad Maidan
सहारनपूर हिंसेच्या विरोधात आझाद मैदानात निदर्शने
Azad Maidan, Mumbai  -  

उत्तर प्रदेश येथील सहारनपूर येथील दलितांवरील हिंसेच्या विरोधात सोमवारी आझाद मैदान येथे विविध संघटना आणि 'संविधान संवर्धन समिती'च्या पुढाकाराने निदर्शने करण्यात आली. संविधान संवर्धन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 'राष्ट्र सेवा दला'सह अनेक समविचारी संघटनांचे प्रतिनिधी या निदर्शनात सहभागी झाले होते.

'उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे गेले तीन आठवडे ठाकूर-दलित संघर्ष धुमसत आहे. दलितांची बेचिराख घरे, अमानुष मारहाण, खून यातून उच्च जातीय सरंजामी मानसिकता आजही काय थराला जाऊ शकते याचे हे ठळक उदाहरण आहे', अशा शब्दांत सहरनपूर येथे जाऊन आलेले ललित बाबर यांनी तेथील परिस्थितीची माहिती दिली.

या निदर्शनात माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार विद्या चव्हाण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर, युवराज मोहिते, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष शरद कदम, ललित बाबर, मिलिंद रानडे, प्रमोद निगुडकर, उदय भट, सुरेश सावंत, हिरामण खंडागळे, मुमताज शेख, शैलेंद्र कांबळे, जनता दलाच्या ज्योती बढेकर, वैशाली जगताप, महादेव पाटील, अजित बनसोडे, राजू रोटे आदी सहभागी झाले होते.

Loading Comments