शौचालय तोडल्याच्या निषेधार्थ मोर्चा

गोरेगाव - शौचालय तोडल्याच्या निषेधार्थ गोरेगाव फिल्मसिटीच्या प्रवेशद्वाराजवळ स्थानिक रहिवाशांनी शुक्रवारी संध्याकाळी रस्तारोको आंदोलन केले. फिल्मसिटी रोड येथे असणाऱ्या संतोषनगरमधील गोरखपूर चाळ येथे आमदार विद्या चव्हाण यांच्या निधीतून शौचालय बांधण्यात आले होते. मागील 15 दिवसांपूर्वी बांधण्यात आलेल्या या शौचालयावर पालिकेने कडेकोट पोलीस बंदोबस्तात गुरुवारी कारवाई केली. त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन करण्यात आले. फिल्मसिटी आणि प्रशासनाची मान्यता घेऊन बांधण्यात आलेले हे शौचालय कुणाच्या आदेशाने पाडण्यात आले. असा प्रश्न या वेळी आंदोलकांनी पोलिसांना विचारला. जोपर्यंत हे शौचालय पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिले जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

Loading Comments