Advertisement

पालिकेच्या अनास्थेमुळे शौचालयाचे काम अर्धवट


पालिकेच्या अनास्थेमुळे शौचालयाचे काम अर्धवट
SHARES

नॉर्वेत राहणाऱ्या तरुण-तरुणींनी मुंबई सेंट्रल स्थानकाच्या बाहेर शौचालय बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. महिलांसाठी शौचालय बांधण्याचं काम वेगानं सुरूही होतं. हे शौचालय एप्रिल महिन्यात महिलांच्या सेवेसाठी चालू करण्यात येणार होतं. मात्र पालिकेच्या अनास्थेमुळे मे महिना उजाडला तरी त्याचं काम पूर्ण न झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

परदेशात राहणाऱ्या नागरिकांनी मुंबई सेंट्रल स्थानक परिसरात शौचालय बांधण्याचे काम 'बॅक इन रिन' या संस्थेतर्फे हाती घेतलं होतं. मात्र या संस्थेने शौचालयाचं पुढचं काम पालिकेला सुपूर्द केलं होतं. पालिकेकडून हे अंतिम टप्प्यातील काम पूर्ण न झाल्याने रहिवाशांची निराशा झाली आहे. दरम्यान, शौचालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, तांत्रिक अडचणीमुळे ते थांबल्याची प्रतिक्रिया नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा