Advertisement

यंदा डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भीती

दिवाळीनंतर बाजारात येणाऱ्या नवीन डाळींचा यंदा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

यंदा डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भीती
SHARES

दिवाळीनंतर बाजारात येणाऱ्या नवीन डाळींचा यंदा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यंदा पावसाळ्यातील पेरण्या जवळपास मागील वर्षी इतक्याच आहेत. त्या तुलनेत मागणी मात्र वाढण्याची स्थिती आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक डाळ उत्पादनांपैकी एक राज्य आहे. त्यातही तूर लागवडीत महाराष्ट्र हा देशात अग्रेसर असतो. 

देशाला डाळींचा पुरवठा करणारी मुख्य बाजारपेठ ही अकोला, नागपूर व मुंबईत आहे. यंदा मात्र जेमतेम लागवडीमुळे तुटवड्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत विविध संस्थांच्या अहवालानुसार ११ सप्टेंबरपर्यंत राज्यात विविध डाळींचा विचार केल्यास मागीलवर्षीपेक्षा ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर अतिरिक्त पेरणी झाली आहे. पण डाळींची मागणी सातत्याने वाढती आहे. त्या तुलनेत ही वाढ फार नाही आहे.

तूर डाळीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील तुरीची उत्पादकता साधारण ७०० किलो प्रति हेक्टर आहे. त्यानुसार यंदा राज्यातून ८.९४ लाख टनच उत्पादनाची चिन्हे आहेत. काही प्रमाणात मध्य प्रदेशातही तूर डाळीचे उत्पादन घेतले जाते. पण देशाची मागणी ही जवळपास २६ लाख टन आहे. तांदळाच्या पेरणीतही यंदा ४१ हजार हेक्टरची वाढ झाली आहे.

यंदा कोरोना संकटामुळे अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' करीत आहेत. यामुळे घराघरातून तांदळाची मागणी वाढली आहे. त्यामुळेच ४१ हजार हेक्टरची वाढ ही तशी खूपच कमी आहे. नवीन तांदूळ हा साधारण नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान बाजारात येत असतो. त्यादरम्यान तांदळाचे दर वधारण्याची शक्यता आहे. राज्यातील तांदळाची उत्पादकता साधारण २.१५ टन प्रति हेक्टर आहे. त्याचा विचार केल्यास राज्यात यंदा तांदळाचे जेमतेम ३० ते ३२ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा