Advertisement

पंढरपुरला जाण्यासासाठी वारकऱ्यांची मुंबई हायकोर्टात याचिका

जगन्नाथ पुरी रथ यात्रेला जर परवानगी मिळत असेल तर काही अटी शर्थींसह वारीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

पंढरपुरला जाण्यासासाठी वारकऱ्यांची मुंबई हायकोर्टात याचिका
SHARES
Advertisement

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता पंढरपूरच्या वारीला मनाई करण्यात आली आहे. परंतु, आता वारकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वाखरी ते पंढरपूर पायी वारी करू द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

पुण्यातील वारकरी सेवा संघाकडून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. जगन्नाथ पुरी रथ यात्रेला जर परवानगी मिळत असेल तर काही अटी शर्थींसह वारीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

वारकरी सेवा संघानं याचिकेत म्हटलं आहे की, वाखरी ते पंढरपूर दरम्यानच अंतर १०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत चालत जाऊन पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नगर प्रर्दक्षिणा, स्नान, गोपाळकाला, वारीतील या परंपरा पूर्ण करण्यासाठी पोर्णिमेपर्यंत मुक्कामी राहण्याची परवानगीही द्यावी.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपुरला चाचलो आहे, असं स्पष्ट केलं. ते म्हणाले, 'आपली आषाढी वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे आणि मी पंढरपुरला चाललो आहे. विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार. विठू रायाला साकडं घालणार आहे, राज्यात काय परिस्थिती निर्माण झाले आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहे. अनेक चित्रपटातून तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहे. राज्यावरील कोरोना संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी पाठीशी उभे राहावे.हेही वाचा

महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन कायम, १ जुलैपासून ‘मिशन बिगीन अगेन’ २.० होणार सुरू

ठाण्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन

संबंधित विषय
Advertisement