Advertisement

दोन लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारतींवर क्यूआर कोड लावा : आदित्य ठाकरे

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्या.

दोन लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारतींवर क्यूआर कोड लावा : आदित्य ठाकरे
SHARES

मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. याबरोबरच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्या. तर रहिवाशांचे दोन्ही डोस झालेल्या इमारतींवर क्यूआर कोड लावण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.   

आदित्य ठाकरे म्हणाले की, दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारती, कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल. त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मुंबई महानगरपालिकेला केली.

आदित्य ठाकरे यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन आणि इतर सुविधा यासंबंधी आढावा घेतला. त्याचबरोबर व्हेक्टर बॉर्न डीसीजवर नियंत्रण मिळवण्याबाबत स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

मागील आठवड्यात फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एका दिवसात मुंबईत १.२७ लाख महिलांचे लसीकरण करण्यात यश आले. याबद्दल संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करण्यात आले.

आदित्य ठाकरे म्हणाले, यापुढे लसीकरणाचा दुसरा डोस देण्याबाबतही योग्य नियोजन करावं. यामध्ये महिलांबरोबरच विद्यापीठांचे विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक यांचा प्राधान्यानं समावेश करण्यात यावा. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संबंधित उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.हेही वाचा

दिलासादायक! कोरोनाच्या दैनंदिन मृत्युसंख्येत मोठी घट

पावसामुळं सीएसएमटी येथील हिमालय पुलाचे काम बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा