Advertisement

रायगड: समुद्रकिनाऱ्यावर दहशतवादी बोट सापडली, बोटीत AK ४७ आणि गोळ्या


रायगड: समुद्रकिनाऱ्यावर दहशतवादी बोट सापडली, बोटीत AK ४७ आणि गोळ्या
SHARES

रायगड जिल्ह्यात  श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. 

रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेली संशयास्पद बोट (Raigad Suspected Boat) ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली.

बोटीबद्दल काय माहिती? 

  • हरिहरेश्वर समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळली.
  • बोटीवर 3 एके-47 रायफल्स आणि 225 राऊंड्स (काडतुसं) आढळले.
  • बोटीवर 10 बॉक्स सापडले.
  • बोटीची नोंदणी ब्रिटनमध्ये केली असल्याची माहिती.
  • बोटीवर असलेले दोन जण ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाचे नागरिक असल्याची माहिती.
  • ही बोट ओमानमधून भरकटल्याची शक्यता.
  • संशयास्पद बोट आढळल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी.
  • बोटीवर हत्यारं आढळल्यानं संशय बळावला.
  • एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल घटनास्थळाकडे रवाना.
  • दहशतवादी कनेक्शन आहे का? याबाबत एटीएसकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा