बोरिवलीत रेल्वेच्या जागेची परस्पर विक्री

 Borivali
बोरिवलीत रेल्वेच्या जागेची परस्पर विक्री
बोरिवलीत रेल्वेच्या जागेची परस्पर विक्री
बोरिवलीत रेल्वेच्या जागेची परस्पर विक्री
See all

बोरीवली - पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या बोरीवली ते दहीसरपर्यंत रेल्वेच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अवैध झोपड्या तयार करून त्या विकण्याचा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या अवैध झोपड्या रोज तयार केल्या जातात आणि त्यांना दुकान असं सांगून लाखो रुपयांत विकल्या जातात.

सूत्रांच्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेच्या बोरीवलीमध्ये रेल्वे लाईनच्या कडेला सुरक्षा कवच लावले आहे. तरी देखील या लाईनच्या आतमध्ये अवैध शेकडो झोपड्या उभारल्या गेल्या आहेत. दरम्यान याबाबत पालिका आयुक्त विजय कांबळे यांना विचारलं असता त्यांनी ती रेल्वेची हद्द असल्याने त्यावर आम्ही कारवाई करू शकत नसल्याचे सांगितले. यावर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता बोरीवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Loading Comments