Advertisement

मुंबईत शनिवारपर्यंत मुसळधार पाऊस

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभरात जोरदार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईमध्ये शहरात २६.७३ मि.मी., पूर्व उपनगरांत ४४.७ मि.मी. तर पश्चिम उपनगरांत ४२.२१ मि.मी. पाऊस पडला आहे.

मुंबईत शनिवारपर्यंत मुसळधार पाऊस
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. येत्या शनिवारपर्यंत शहर परिसरात मुसळधार पाऊस पडत राहील, असा अंदाज हवामान विभागा (आयएमडी) ने वर्तवला आहे.


दिवसभरातही जोरदार

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभरात जोरदार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईमध्ये शहरात २६.७३ मि.मी., पूर्व उपनगरांत ४४.७ मि.मी. तर पश्चिम उपनगरांत ४२.२१ मि.मी. पाऊस पडला आहे. सद्यस्थितीत मुंबई उपनगरांसहित वसई-विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि रायगडमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे.


 


पावसाचा फटका बसल्याने मध्य रेल्वे २० ते २५ मिनिटे उशीराने धावत असून हार्बर मार्गावरील लोकलही अर्धा तास उशीराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना सकाळच्या गर्दीत नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.


भरती, अहोटी कशी असेल?

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जोरदार वाऱ्यासोबतच सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ३.८८ मीटर उंचीची लाटा उसळण्याची शक्यता आहे, रात्री १०.५५ वाजता लाटांची उंची १.७८ मीटर इतकी असेल.

तर शुक्रवारी पहाटे ५.१२ वाजता ३.२३ मीटर आणि सकाळी १०.३८ वाजता १.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



हेही वाचा-

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प!

कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा