Advertisement

मुंबई, उपनगरांमध्ये पुढील २४ तासात पावसाचा इशारा

पश्चिम विदर्भावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई तसेच मुंबई उपनगर परिसरामध्ये पुढील २४ तासांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबई, उपनगरांमध्ये पुढील २४ तासात पावसाचा इशारा
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात सोमवारपासून पावसानं हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. अशातच पश्चिम विदर्भावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबई तसेच मुंबई उपनगर परिसरामध्ये पुढील २४ तासांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अगदी जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळं राज्यातील एकूण १६ जिल्ह्यांसह मुंबई आणि पुणे शहरांतही हंगामातील पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे पडला आहे.

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या पश्चिमेकडील काही भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरांमध्ये पुढील २४ तास संततधार पाऊस सुरु राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या चोवीस तासांत विदर्भात अनेक ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी होती. सोमवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. जळगाव, महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी आदी भागांतही पाऊस झाला. मुंबई आणि पुण्यात हलक्या सरी कोसळल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा