वाढता पाऊस, आजारांना निमंत्रण

दहिसर - गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. तसेच या पावसामुळे आजारांचे वाढते प्रमाणही दिसून येत आहे. अशातच ऋतूप्रमाणे होणा-या आजारातही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येते. दहिसरमध्ये आधीच नागरीक ताप, मलेरिया आणि डेंग्यु अशा आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच हा वाढता पाऊस नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.

Loading Comments