Advertisement

निसर्गाचं रौद्ररुप! पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान

तर पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी ३२०२ फोन आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर शाँक लागून दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एक रेल्वे अधिकारी आहे.

निसर्गाचं रौद्ररुप! पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान
SHARES

मुंबईत पडणारा पाऊस हा दरवर्षी पालिकेसह मुंबईकरांची परीक्षा घेत असतो. मुंबईत बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झाली आणि  नालेसफाई झाल्याचा पालिकेचा दावा फोल ठरला.  दोन दिवस मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शहरात तब्बल ३६१ ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे शहरातील सर्वच मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. तर पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी ३२०२ फोन आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर शाँक लागून दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एक रेल्वे अधिकारी आहे.

हेही वाचाः-Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई, ‘हे’ रस्ते बंद

मुंबईवर आधीच कोरोनाचे सावट असताना वेळोवेळी पाऊस हा परीक्षा घेत आहे. मुंबईत २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात  हिंदमाता, दादर टीटी, सायन रोड नं २४ , गांधी मार्केट,  सायन रोड नं १४ रुईया काँलेज, एसआयईएस काँलेज, समाज मंदीर हाँल, प्रतिक्षानगर या ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी साचले. तर पश्चिम उपनगरात अंधेरी सब वे, खार लिंक, दहिसर सब वे,  रोड,नॅशनल काँलेज वांद्रे, वीरा देसाई रोड या ठिकाणी पाणी साचले होते. तर पूर्व उपनगरात शितल सिनेमा बैलबाजार, टेंबी ब्रीज, चेंबूर, पोस्टल काँलनी चेंबूर  या ठिकाणी पाणी तुंबले साचले असून काही ठिकाणी वाहने पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळते. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता.  दक्षिण मुंबईतील जेजे रुग्णालयात पाणी साचल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. त्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचारी युद्ध पातळीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी कार्यरत होते.

हेही वाचाः-कोरोनाचा कहर ! राज्यात दिवसभरात ३३४ जणांचा मृत्यू, १० हजार ३०९ नवे रुग्ण

तर मुंबईत सोमवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मागील २४ तासात ३६१ झाडे आणि फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पावसामुळे मुंबईत शाँर्ट सर्किटच्या ५७ घटना घडल्या आहेत. . त्यात शहरात ४८, पूर्व उपनगरात ३, पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी घटना घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. दहिसरमध्ये आनंद नगर येथील माईल स्टोन सोसासयटीत राहणाऱ्या शंभु सोनी (३८) याचा शाँक लागून मृत्यू झाला. तर रेल्वे कर्मचारी संजीव (२२) यांचा मस्जीद बंदर येथे  शाँक लागून मृत्यू झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे . तर घरे पडल्याच्या घटना १५ ठिकाणी घडल्या असून  शहरात ६ , पूर्व उपनगरात ६, पश्चिम उपनगरात ३ घटना घडल्या आहेत. तर मुसळधार पावसात कमला नेहरु पार्क, पेडर रोड ते के म्स कॉनिर, मलबार हिल येथे डोंगराळ भागावरची झाडे पडून संरक्षण  भिंतीचा भाग कोसळला. वेळीच सर्व ठिकाणी मदतकार्य पाठवण्यात आली आहेत. तर पावसामुळे सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे शहरातील २५ ठिकाणांवरील वाहतूक ही पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे.


वाहतूक वळवण्यात आलेले मार्ग

हिंदमाता, प्रतिक्षानगर, शेर काँलनी-चेंबूर, वांद्रे टाँकीज, शास्त्रीनगर-गोरेगाव, दहिसर सब वे, एस.व्ही.रोड अंधेरी मार्केट, अजित ग्लास- ओशिवरा पूल, खोदादाद सर्कल-दादर, शितल सिनेमा बैलबाजार- कुर्ला, विद्याविहार स्थानक, ओबेराँय माँल, मालाड सब वे, आशिर्वाद हाँटेल, भाऊ दाजी रोड, अंधेरी एमआयडीसी-मरोळ, बामन दया पाडा, मुलुंड एलबीएस मार्ग, गोल देऊळ, भेंडीबाजार, परळ ब्रीज, मालवणी म्हाडा काँलनी, अँण्टाँप हिल, संगम नगर, मराठा काँलनी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा