Advertisement

मुसळधार पावसाचा झेंडूच्या फुलांना फटका

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

मुसळधार पावसाचा झेंडूच्या फुलांना फटका
SHARES

मुंबईसह राज्यभरात सणासुदीला झेंडूच्या फुलांना (marigold flowers) मोठा मान असतो. देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची खरेदी करतात. परंतू, यंदाच्या वर्षी झेंडूची फुलं मिळणं कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात कोसळणाऱ्या पावसाचा (heavy rains) झेंडूच्या फुलांना फटका बसण्याची शक्यता आहे.

या वर्षी झेंडूच्या बागांच्या (marigold flowers farm) शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक संकट येत असून येत्या काही दिवसांमध्ये पाऊस कोसळण्याच्या शक्यत्येनं त्यात आणखी भर पडली आहे. कोरोनाकाळात झेंडू शहरात पाठवता येत नसल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. मागील आठवड्यातील चक्रीवादळसदृश परिस्थिती आता निवळली असली तरी बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, पुन्हा पाऊस झाल्यास दसऱ्यापर्यंत दर्जेदार आणि न भिजलेला झेंडू मुंबईच्या बाजारात मिळणं कठीण होईल अशी शक्यता दिसत असल्याचं शेतकरी आणि व्यापारी यांनी नमूद केलं आहे. गणेशोत्सवानंतर दसऱ्यासाठी नवीन लागवड करणं फारसे शक्य नसते, अधिक महिना अश्विन असल्यानं दसरा डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी आधीच लागवड केली. मात्र गेल्या आठवड्यातील पावसामुळं फुले भिजून मोठी हानी झाल्याची माहिती मिळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा