Advertisement

मुंबई, ठाण्यासह कोकणात गुरुवारपासून वादळी पाऊस!

कमी पावसामुळे कमाल तापमान आणि आर्द्रतेत वाढ झाली आहे.

मुंबई, ठाण्यासह कोकणात गुरुवारपासून वादळी पाऊस!
SHARES

मुंबई, ठाण्यासह शुक्रवार, 12 जूनपासून 17 जूनपर्यंत कोकणात मुसळधार वादळी पाऊस बरसणार आहे. याबाबत हवामान खात्याकडून खबरदारीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये नदीकाठच्या गावांना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

कोकणात मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहण्याचाही धोका हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. शिवाय नद्यांना पूर येऊन नागरी जीवनही विस्कळीत होऊ शकते, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

शिवाय घाटरस्त्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे दृश्यमान्यताही कमी होऊ शकते. तसेच मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचाही धोकाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये 13 आणि 14 जून रोजी ताशी 45 ते 55 किमीपर्यंत वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे वादळी पावसापासून सावध रहावे, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. किनाऱ्यालगतच्या गावांना धोका असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.



हेही वाचा

खड्डे बुजविण्यासाठी 227 वॉर्डांमध्ये उपअभियंते नियुक्त

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा