चेंबूरच्या कामगार वसाहतीतील सांडपाणी रस्त्यावर

 Lokhande Road
चेंबूरच्या कामगार वसाहतीतील सांडपाणी रस्त्यावर

लोखंडे मार्ग - चेंबूर रेल्वे स्थानकाच्या शेजारच्या पी. एल. लोखंडे मार्गावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका कामगार वसाहतीत महिन्याभरापासून मलमूत्र वाहून नेणारी वाहिनी फुटल्यानं मलमूत्र रस्त्यावर वाहतंय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या वसाहतीत पालिकेच्या सेवेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारती असून अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहतायत.

महिन्याभरापासून या वसाहतीमधील इमारत क्र. 7 जवळील मलमूत्र वाहून नेणारी वाहिनी फुटल्यानं आजूबाजूला मोठया प्रमाणात मलमूत्र साचतंय. त्यामुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय. याबाबत पालिकेकडे अनेकदा तक्रारदेखील केली आहे. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी विजय मस्के यांनी केला आहे.

Loading Comments