Advertisement

ATKT विद्यार्थी 'असे' होणार पास, लवकरच निर्णय जाहीर

राज्यातील परीक्षांसंदर्भातील शिफारशी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागानं एक समिती नेमली आहे.

ATKT विद्यार्थी 'असे' होणार पास, लवकरच निर्णय जाहीर
SHARES

ATKT असलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग लवकरच निर्णय जाहीर करणार आहे. ATKT च्या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच सरासरीचा फॉर्म्युला वापरत उत्तीर्ण करावं, अशी शिफारस कुलगुरुंच्या समितीनं राज्य सरकारला केली आहे. ही शिफारस येत्या दोन दिवसांत मंजूर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील परीक्षांसंदर्भातील शिफारशी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागानं एक समिती नेमली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल. या समितीची शनिवारी ४ जुलै रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यात पेडणेकर यांनी ATKTच्या विद्यार्थ्यांसंदर्भातील ही शिफारस मांडली.

कुलगुरुंच्या समितीनं म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयांमध्ये अंतर्गत मूल्यमापन तसंच आधीच्या एकूणच कामगिरीच्या आधारे गुण द्यावेत. जर विद्यार्थ्याला एखाद्या विषयात उत्तीर्णतेसाठी गुण कमी पडत असतील तर त्याला ग्रेस मार्क द्यावेत.

ते पुढे म्हणाले की, अन्य केटी नसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पदवीदान होईल. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार करायची असेल त्यांनी नंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा द्यावी. या दोन अंशत: दुरुस्ती परीक्षेसंदर्भातील जीआरमध्ये कराव्यात अशी शिफारस समितीनं उच्च व तंत्र शिक्षण विभागाला केली आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा