Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

मुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांसाठी भरती
SHARES

मुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीत एकूण  ४० जागा भरल्या जाणार आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर या पदासाठी १७ जागा, सिस्टिम ऑफिसर या पदासाठी २३ जागा अशा एकूण ४० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२१ आहे.  

शैक्षणिक पात्रता

१) पद क्र.१- १) बी.इ./ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए २) नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसइ/ आरएचसीइ/ आरएचइएल ३) ५ वर्षे अनुभव.

२) पद क्र.२- १) बी.इ./ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए २) नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसइ/ आरएचसीइ/ आरएचइएल ३) १ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावं.

शुल्क

उमेदवारांकडून कोणतंही शुल्क आकारलॆ जाणार नाही.

वेतन

सीनियर सिस्टिम ऑफिसर – ४६,००० रु.

सिस्टिम ऑफिसर – ४०,००० रु.

नोकरीचे ठिकाण

मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे २०२१

अधिक माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://bombayhighcourt.nic.in/index.php वरून माहिती मिळवू शकता.हेही वाचा -

  1. बापरे! मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या

  2. परराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा