रिलायन्स, अमिताभकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

महानायक अमिताभ बच्चन आणि रिलायन्स फाऊंडेशनने सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी मदत दिली आहे.

SHARE

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढं सरसावला आहेरिलायन्स फाऊंडेशनने सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चेक स्वरुपात जमा केली आहे. त्याशिवाय, महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत केली आहे.

मदतीचा हात पुढे

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावासामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या पाण्यामुळं लाखो घरं बेघर झाली असून त्यांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा हात पुढे केला जातं आहे. मराठी कलाकार, संस्था, राजकीय नेते, गणेश मंडळं यांसारख्या अनेकांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचं आवाहन करत आहे.

पूरग्रस्तांना मदत

अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचं कौन बनेगा करोडपतीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. 'मी पूरग्रस्तांना मदत करणार असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मी रक्कम जमा करणार असून या संकटात लोकांनीदेखील मोठ्याप्रमाणं आपल्या बांधवांना मदत केली पाहिजे, असं मी या माध्यमाद्वारे लोकांना सांगत आहे. सोशल मीडियावरून अधिकाधिक लोकांना आवाहन कसं करता येईल, याबाबत माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं आहे’, असं बच्चन यांनी म्हटलं होतं.

२५ लाखांचा चेक

याआधी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत केली आहे. त्यांनी २५ लाखांचा चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिला आहे.हेही वाचा -

बिझनेसमध्ये उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं- मनोहर जोशी

'या' कारणांमुळं मुंबई सेंट्रल स्थानक ठरलं 'आदर्श स्थानक'संबंधित विषय
ताज्या बातम्या