Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

'या' कारणांमुळं मुंबई सेंट्रल स्थानक ठरलं 'आदर्श स्थानक'

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानक 'आदर्श स्थानक' ठरलं आहे.

'या' कारणांमुळं मुंबई सेंट्रल स्थानक ठरलं 'आदर्श स्थानक'
SHARE

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानक 'आदर्श स्थानक' ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरकतेच्या तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्यानं मुंबई सेंट्रल स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेत स्थानकाला ‘आयएओ १४००१ : २०१५’(iso 14001 : 2015) या प्रमाणपत्रानं गौरविण्यात आलं आहे. त्यामुळं 'मे-२०१९ ते मे-२०२२'पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्रधारक स्थानक म्हणून ओळखलं जाणारं मुंबईतील हे एकमेव स्थानक आहे.

पर्यावरणीय प्रकल्प

रेल्वेच्या निकषांनुसार रेल्वे स्थानकातील एकूण जागेपैकी ३० टक्के जागेवर उद्यान उभारणं आवश्यक आहे. मात्र, मुंबई सेंट्रलमध्ये जागेची अडचणी असल्यानं टप्प्या टप्प्यांमध्ये छोटेखानी उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. स्टेशन आणि प्लॅटफॉर्मची स्वच्छता, कचरा आणि मलजलाच्या विल्हेवाटीसाठी बायोगॅस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. विजेच्या बचतीसाठी सूर्यप्रकाश परावर्तित करणारे दिवे छतावर बसविण्यात आले आहेत. यांसारख्या पर्यावरणीय प्रकल्पांमुळं आंतरराष्ट्रीय संस्थेनं दखल घेत मुंबई सेंट्रल स्थानकाला गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रानं गौरविलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन

देशातील एखाद्या गुणवत्तेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डडायझेशन' मानांकन घेतलं जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता १२० देशांनी एकत्र येऊन एक प्रमाण निश्चित केलेलं आहे.हेही वाचा -

अशा नोटिशींना मनसे भीक घालत नाही- संदिप देशपांडे

टीम इंडियाला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आला मेलसंबंधित विषय
ताज्या बातम्या