Advertisement

टीम इंडियाला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आला मेल

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) वेस्ट इंडीज (West Indies) दौऱ्यावर असून या संघावर हल्ला करण्यात येईल असा धमकीचा मेल पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) मिळाल्याची माहिती मिळते आहे.

टीम इंडियाला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आला मेल
SHARES

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) वेस्ट इंडीज (West Indies) दौऱ्यावर असून या संघावर हल्ला करण्यात येईल असा धमकीचा मेल पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) मिळाल्याची माहिती मिळते आहे. हा धमकीचा मेल (Mail) पाकिस्तान क्रिकेट मंडळानं (PCB) बीसीसीआय आणि आयसीसीला फॉरवर्ड केला आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघाला धोका नसल्याचं स्पष्ट मत बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसीनं (ICC) केलं आहे.

हल्ल्याची धमकी

धमकीचा मेल थेट भारतीय संघाला न पाठवता पीसीबीला पाठवण्यात आला आहे. मात्र, हल्ल्याची धमकी देणाऱ्या दहशतवादी गटाच्या नावाचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आलेला नाही. दरम्यान, पीसीबीनं तात्काळ हा मेल बीसीसीआय आणि आयसीसीला फॉरवर्ड केला आहे.

वृत्ताचं खंडन

त्यानंतर बीसीसीआयनं याबाबत गृहमंत्रालयाला कळवलं आहे. त्यानंतर, आयसीसी आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं ही अफवा असल्याचं म्हटलं. त्याशिवाय, बीसीसीआयनं या वृत्ताचं खंडन केलं आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट दौऱ्यावर असून यांच्यातील टी-२० (T-20) आणि वनडे (ODI) मालिका संपली आहे. या दोन्ही मालिका भारतीय संघानं जिंकल्या आहेत.हेही वाचा -

अशा नोटिशींना मनसे भीक घालत नाही- संदिप देशपांडे

स्पाच्या नावाखाली अंधेरीत देहविक्री, विदेशी मुलींचा सहभागRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा