Advertisement

बिझनेसमध्ये उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं- मनोहर जोशी

'कोहिनूर स्क्वेअर'मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री आणि 'कोहिनूर समूहा'चे संस्थापक मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बिझनेसमध्ये उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं- मनोहर जोशी
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व कोहिनूर ग्रुपचे उन्मेश जोशी यांना सक्तवसुली संचलनालयानं 'कोहिनूर स्क्वेअर'मधील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यानंतर चौकशीसाठी उन्मेश जोशी यांनी सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यावेळी २ तासांहून जास्त वेळ त्यांची चोकशी सुरू होती. मात्र, या संपुर्ण प्रकरणावर शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री आणि 'कोहिनूर समूहा'चे संस्थापक मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'काही सांगणं योग्य नाही'

'अचानक नोटीस येण्यामागे कदाचित काही काळंबेरं असूही शकतं. अर्थात, पूर्ण माहिती मिळेपर्यंत त्याबद्दल काही सांगणं योग्य नाही. उद्योग-व्यवसायात उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं', अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिली आहे. त्याशिवाय, राज ठाकरे यांनी नोटी बजावल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. 

'काही विशेष वाटत नाही'

या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'मला या नोटिशींमध्ये काही विशेष वाटत नाही', असं म्हटलं आहे. 'ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या आपल्या देशातील स्वायत्त संस्था आहेत. त्या आपापल्या पद्धतीनं काम करत असतात. त्यांना ते करू दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडं राजकारणाच्या दृष्टीनं बघणं योग्य नाही. मला या नोटिशींमध्ये काही विशेष वाटत नाही,' असं राऊत यांनी म्हटलं.हेही वाचा -

टीम इंडियाला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आला मेल

'या' कारणांमुळं मुंबई सेंट्रल स्थानक ठरलं 'आदर्श स्थानक'संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा