Advertisement

अनंत अंबानीच्या साखरपुड्याच्या 'पुड्या'!

मुकेश आणि निता अंबानी यांचा तिसरा मुलगा अनंत अंबानीच्या साखरपुड्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र ही चर्चा केवळ सोशल मीडियावर रंगली असून ही चर्चा खोटी असल्याची माहिती समोर येत आहे.

अनंत अंबानीच्या साखरपुड्याच्या 'पुड्या'!
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. मुलगी इशा आणि मुलगा आकाश या दोघांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. तिकडे इशा अंबानीच्या लग्नासाठी डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. असं असताना मुकेश आणि निता अंबानी यांचा तिसरा मुलगा अनंतच्या साखरपुड्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र ही चर्चा केवळ सोशल मीडियावर असून ही चर्चा खोटी असल्याची माहिती समोर येत आहे.


ही चर्चा तर अफवाच

अनंतचा त्याची मैत्रिण राधिका मर्चंट हिच्यासोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला नि चर्चेला पेव फुटला. त्याच्या अफेयर्सची आणि साखरपुड्याची चर्चा जोर धरू लागली. या दोघांचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा असताना ही चर्चा अफवा असल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्स ग्रुपच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आल्यानं अनंत आणि राधिकाचा साखरपुडा झाला नसल्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.कोण आहे राधिका?

राधिका ही अनंतची जवळची मैत्रिण असून ती व्यावसायिक विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. अंबानी आणि मर्चंट कुटुंबाचे घनिष्ट संबंध असून इशा आणि आकाश अंबानीच्या साखरपुड्याला मर्चंट कुटुंब, राधिका हजर होते.

इतकंच नव्हे, तर राधिकनं आकाश अंबानीची होणारी बायको श्लोकाबरोबर घूमर या गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर अनंत आणि राधिकाचे फोटो व्हायरल व्हायला लागले नि त्याबरोबरच त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा रंगू लागल्या.

पण राधिका आणि अनंत चांगले मित्र असून त्यांच्यात असं कोणतंही नातं नसल्याचं रिलायन्सच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानं साखरपुड्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अनंत आणि राधिकाबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर सुरूच आहेत.


हेही वाचा - 

अंबानींच्या मुलीला मंदिरात केलं प्रपोज! डिसेंबरमध्ये होणार लग्न?

कृणाल पंड्याच्या विवाहसोहळ्याला या दिग्गजांची उपस्थिती

Read this story in हिंदी
संबंधित विषय