Advertisement

धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवा- आवाज फाउंडेशन

मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवून ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याची मागणी आवाज फाउंडेशननं केली आहे.

धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवा- आवाज फाउंडेशन
SHARES

मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवून ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याची मागणी आवाज फाउंडेशननं केली आहे. राज्य सरकरनं देशभर धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकर हटविण्यात यावे अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमायरा अब्दुल अली यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

आवाज फाउंडेशननं मुंबई उच्च न्यायालयानं याबाबत याचिका ही दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयानं आपल्या निकालात धर्म म्हणजे ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन करण्याचं ठिकाण नसल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकार आणि पोलिसांना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचंही म्हटलं. सर्वोच्च न्यायालयानंही महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला या संदर्भांतील निर्देश वेळोवेळी दिले आहेत.

आवाज फाउंडेशनकडं नागरिकांच्या आलेल्या तक्रारी मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांना ट्विटरवरून दाखल केल्या आहेत. याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी ही करण्यात आली. सध्या सोशल मीडिया प्रभावी आहे. मोबाईल फोन, टेलिव्हिजन आणि रेडिओ नेटवर्क यासारखे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कोणताही संदेश तात्काळ आणि प्रभावीपणे देऊ शकतो. त्यासाठी धार्मिक किंवा राजकीय कामासाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्याची आवश्यकता नाही असं ही आवाज फाउंडेशननं आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हे केवळ ध्वनी प्रदूषणावरच नियंत्रण ठेवत नाही तर यामुळं कोविड सारख्या साथीच्या काळात देखील संसर्गाचा धोका टळणार आहे. लोकांची धार्मिक कार्यक्रमांसाठी होणारी गर्दी टाळता येणार आहे. धार्मिक कामांसाठी रेडिओ, टेलिव्हिजन आणि मोबाईल फोनसारख्या नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरणं सक्तीचं करणं आवश्यक असून लाऊडस्पीकर सारखे आवाजाचे प्रदूषण टाळता येणार असल्याचं सुमायरा अब्दुल अली यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा