मस्जिद रोडवरील रस्त्याचं काम अर्धवट

 Masjid
मस्जिद रोडवरील रस्त्याचं काम अर्धवट

मस्जिद - काझी सय्यद स्ट्रीटवरील मस्जिद रोडवर काही दिवसांपूर्वी मल-नि:सारण पाईपचं काम करण्यात आलं. पण रस्त्याचं काम योग्यरित्या पूर्ण झालेलं नाही. रस्त्याचं काँक्रिटीकरण न करता अजूनही तो त्याच अवस्थेत आहे. त्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्यांना अडथळा होत आहे. तर, या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केलीय.

Loading Comments