• खोदलेल्या रस्त्याचं काम अपूर्ण
  • खोदलेल्या रस्त्याचं काम अपूर्ण
  • खोदलेल्या रस्त्याचं काम अपूर्ण
SHARE

विलेपार्ले - निवडणुकीच्या तोंडावर सहारगाव इथल्या एएआय (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया) कॉलनी परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी हा रस्ता गेल्या दोन महिन्यांपासून खोदून ठेवला आहे. या विभागातील नगरसेविका विनफ्रेड डिसुझा यांच्या नगरसेवक निधीतून ही दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ता दुरुस्तीचं काम नगरसेवकांना आठवल्याचा आरोप इथले रहिवासी समीर शेख यांनी केला.

रस्ता दुरूस्तीचं काम काही दिवसांपासून बंद पडलं आहे. दुरुस्ती कामासाठी आणलेली रेती, कचरा असाच रस्त्यावर पडून आहे. तर चक्क काही नागरिकांनी येथे आपली वहाने उभी करून ठेवली आहेत. हे काम लवकरच पुर्ण करण्यात येईल असं डिसुझा यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या