SHARE

सर्वोदयनगर - गेल्या कित्येक महिन्यापासून जोगेश्वरीच्या सर्वोदयनगर हेमा इंडस्ट्रिज इथल्या फुटपाथची दुरवस्था झाली आहे. या फुटपाथवर रेबीट, कचरा टाकला जात असल्याने येथून ये-जा करताना नागरिकांची गैरसोय होते. तसेच साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे. येथील स्थानिक नगरसेविका आणि के पूर्व पालिका यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केलं आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका शिवानी परब यांना विचारले असता याकडे लवकरच लक्ष दिलं जाईल. तसंच नागरिकांसाठी फुटपाथ लवकरच पूर्ववत केला जाईल असं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या