Advertisement

बांबूच्या टेकूवर अख्ख्या इमारतीचा भार, विक्रोळीतील म्हाडाची जीवघेणी इमारत


SHARES

घाटकोपरमध्ये साई प्रसाद इमारत कोसळून त्यात १७ निष्पाप रहिवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील म्हाडा संक्रमण शिबिराची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली असून येथील बहुतेक इमारती मोडकळीस आल्या आहेत.

म्हाडा प्राधिकरण या इमारतींच्या पुनर्विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याने या इमारतीतील रहिवाशांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.



बांबूच्या टेकूवर इमारत उभी

येथील इमारत क्रमांक १८० चक्क बांबूच्या टेकूवर उभी आहे. या इमारतीच्या भिंतींना जागोजागी भेगा पडल्या असून प्लास्टर उखडल्याने त्यातून सळ्या बाहेर डोकावत आहेत.

सिलिंगचीही हिच अवस्था आहे. बीमला तडे गेल्याने ही इमारत कधीही कोसळेल, अशी परिस्थिती आहे. अशी ही धोकादायक इमारत रहिवाशांसाठी जणू मृत्यूचा सापळा बनली आहे.




१९९० पासून दुरूस्तीच नाही

संक्रमण शिबिराची ही इमारत १९७३ मध्ये बांधण्यात आली होती. त्यानंतर १९९० मध्ये या इमारतीची एकदा दुरुस्ती करण्यात आली होती. तेव्हापासून म्हाडा प्रशासनाने इथे ढूंकूनही पाहिलेले नाही.

इमारत मोडकळीस आल्यानंतर म्हाडाने येथील रहिवाशांना गोराईत स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले. परंतु या आश्वासनाचा म्हाडाला सोईस्कररीत्या विसर पडलेला आहे.



पुनर्विकासाच्या मागणीकडे कानाडोळा

रहिवाशांनी अनेकदा मागणी करूनही म्हाडा या इमारतीच्या पुनर्विकासाकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे नाईलाजाने रहिवाशांना या इमारतीत डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतानाही दिवस ढकलावे लागत आहेत.

कन्नमवार नगरातील १३ इमारती पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. एका बाजूला लॉटरीच्या माध्यमातून नवीन घरांची विक्री करत असताना म्हाडाने जुन्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांकडेही लक्ष द्यावे, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.



या इमारतींचा पुनर्विकास हाती घेण्यासाठी म्हाडा एखाद्या दुर्घटनेचा मुहूर्त शोधत आहे का? असा सवालही या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी केला आहे.



हे देखील वाचा -

संक्रमण शिबिरार्थी मृत्यूच्या सावटाखाली



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा