अतिधोकादायक इमारतींमध्ये कुर्ला आघाडीवर, घाटकोपर दुसरे

  Mumbai
  अतिधोकादायक इमारतींमध्ये कुर्ला आघाडीवर, घाटकोपर दुसरे
  मुंबई  -  

  मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल ७९१ इमारती या पालिकेने अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. दुरुस्तीपलीकडे असलेल्या आणि रहिवाशांना राहण्यास अयोग्य असल्यामुळे घरे खाली करण्यात येणाऱ्या सी-1 प्रकारातील या सर्व इमारती आहेत. या सी-१मध्ये मोडणाऱ्या सर्वाधिक इमारती या कुर्ला एल विभागात असून घाटकोपर एन प्रभाग हा दुसऱ्या क्रमाकांवर आहे. घाटकोपरमधील साईदर्शन इमारत ही धोकादायक यादीतील नसली, तरीही या वॉर्डात तब्बल ६३ धोकादायक इमारती आहेत.


  केवळ १२५ इमारतीच केल्या खाली

  महापालिकेने धोकादायक ठरवलेल्या ७९१पैकी आतापर्यंत केवळ १२५ इमारतीच रिकाम्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर १९० इमारती पाडण्यात यश आलेले आहे. त्यामुळे आजही तब्बल १४५ इमारतींची प्रकरणे कोर्टात असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


  वॉर्डनिहाय सी -१ प्रवर्गातील अतिधोकादायक इमारतींची संख्या

  • कुर्ला : १११

  • घाटकोपर : ६३

  • विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व : ६२

  • शीव, वडाळा : ६०

  • मालाड : ५०

  • बोरिवली : ३०

  • वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम :२९

  • विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम : २९

  • परळ, शिवडी : २८

  • वरळी, लोअर परळ : १५

  • दादर, माहीम, धारावी : १५

  • वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व :  १२

  • गोरेगाव : १६

  • कांदिवली : १७

  • दहिसर : १०

  • गोवंडी, देवनार : १०

  • चेंबूर, टिळकनगर : १३

  • भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी : १२

  • मुलुंड : १४

  • कुलाबा,फोर्ट : ५

  • पायधुणी : ४

  • चंदनवाडी,गिरगाव : ३

  • ग्रँटरोड : ८

  • भायखळा : ११  हेही वाचा

  घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळली


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.