Advertisement

एनटीसी गिरण्या चाळींचं पुनर्वसन कधी करणार?


एनटीसी गिरण्या चाळींचं पुनर्वसन कधी करणार?
SHARES

दक्षिण मुंबईत विखुरलेल्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळा(नॅशनल टेक्सटाईल काँर्पोरेशन)च्या गिरण्या चाळी उभ्या आहेत. या चाळींना आता जवळपास 100 वर्षे पूर्ण झाली असून आता त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या चाळीत राहणाऱ्या सुमारे 6 हजार गिरणी कामगारांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. त्यामुळे आता तरी या चाळींचा पुनर्विकास होणार का? असा सवाल गिरण्या चाळीतील चाळकऱ्यांकडून विचारला जात आहे. 

गिरणी चाळ भाडेकरु संघर्ष कृती समितीने शुक्रवारी एनटीसीला एक पत्र पाठवत पुनर्विकासाची मागणी केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. मधुसूदन मिल, कोहिनूर मिल, टाटा मिल, इंडिया युनायटेड नं. 1, जाम मिल अशा नऊ गिरण्या चाळी एनटीसीच्या मालकीच्या आहेत. या चाळीत सुमारे 6 हजार गिरणी कामगार 100 ते 125 चौ. फुटाच्या घरात रहातात.


गिरणी कामगारांना पुनर्विकासात काय मिळेल?

गिरण्या चाळीत राहणाऱ्या कामगाराला सेवानिवृत्त झाल्यानंतर चाळीतील घर सोडावे लागत होते. मात्र, गिरणी कामगार लढ्याअंतर्गत चाळीतील कामगारांना कायद्याने संरक्षण मिळवून दिले आहे. त्यानुसार गिरणी चाळीतील कामगार त्याच घरात राहील आणि जेव्हा कधी त्या चाळींचा पुनर्विकास होईल, तेव्हा तर चाळकऱ्यांना मोफत 300 चौ. फुटाचे घर देण्याची महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे.


पुनर्विकासच नाही, घर कधी मिळणार?

गेल्या कित्येक वर्षांपासून गिरणी कामगार चाळकऱ्यांची मोठ्या घरांची मागणी होती. अखेर सरकारने काही महिन्यांपूर्वीच ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार आता गिरण्या चाळींच्या पुनर्विकासांतर्गत गिरणी चाळीतील रहिवाशांना 300 एवजी 405 चौ. फुटांचे घर मिळणार आहे. पण पुनर्विकासाचाच पत्ता नसल्याने चाळकरी चिंताग्रस्त आहेत. चाळी 100 वर्षांच्या झाल्याने चाळकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे मालक म्हणून आता एनटीसीने पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावावा, त्यासंबंधीचे धोरण ठरवावे, अशी मागणी करण्यात आल्याचे दत्ता इस्वलकर यांनी स्पष्ट केले आहे.



हेही वाचा

गिरणी कामगारांना एमएमआरमध्ये 50 टक्के घरे राखीव


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा