Advertisement

गिरणी कामगारांची दिवाळी यंदा हक्काच्या घरात!


गिरणी कामगारांची दिवाळी यंदा हक्काच्या घरात!
SHARES

गिरणी कामगारांसाठी म्हाडाकडून सहा गिरण्यांच्या जागेवर घरे बांधण्यात येत आहेत. या घरांसाठीची ओसी प्रक्रिया येत्या दीड-दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्यामुळे यंदा गिरणी कामगारांची दिवाळी हक्काच्या घरात साजरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारत टेक्स्टाईल, वेस्टर्न इंडिया, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन, रुबी मिल आणि स्वान ज्युबली या सहा गिरण्यांच्या जमिनीवर तब्बल 2634 घरांचं बांधकाम म्हाडाकडून सुरु आहे. 2014 मध्ये या कामाला सुरुवात झाली. दरम्यान, 'या घरांचे बांधकाम सुरू असतानाच या घरांची लॉटरी काढावी', असा आग्रह काही गिरणी कामगार संघटनांनी धरला होता. त्यानुसार 9 मे 2016 रोजी ही लॉटरी काढण्यात आली. यामुळे बांधकाम सुरू असतानाच लॉटरी प्रक्रिया आणि विजेत्यांच्या पात्रता निश्चितीची मोठी आणि वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि ओसी मिळाल्याबरोबर घराचा ताबा मिळावा असा युक्तीवाद संघटनांनी केला. त्यानुसार आत्तापर्यंत अंदाजे 1000 विजेते पात्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


या घरांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या घरांना मुंबई महानगर पालिकेकडून पार्टली ओसीही मिळाली आहे. पूर्ण ओसी दीड-दोन महिन्यांत मिळेल.

सुभाष लाखे, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी


कशी मिळणार घरं?

पात्र ठरलेल्या 1000 विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र पाठवण्यात सुरुवात करण्यात आली आहे. ओसी मिळाल्याबरोबर घराची 100 टक्के रक्कम भरलेल्या विजेत्यांना घराचा ताबा देण्यात येणार आहे. या गणितानुसार पुढीत तीन महिन्यात अर्थात ऑक्टोबरपासून सहा गिरण्यांवरील विजेत्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.


संकेत क्रमांक
गिरणीचे नाव
घरांची संख्या
2
भारत मिल
188
26
वेस्टर्न इंडिया मिल
250
30
सेंच्युरी मिल
1430
48
प्रकाश कॉटन मिल
562
50
रूबी मिल
47
57 बी
स्वान मिल ज्युबली
157

एकूण
2634


अनेक गिरणी कामगारांचे हक्काच्या घरात रहायला जाण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र, आता एमएमआरडीएच्या घराचा ताबा देण्याची प्रक्रियाही म्हाडाने वेगवान करावी आणि इतर कामगारांचेही घराचे स्वप्न पूर्ण करावे.

दत्ता इस्वलकर, अध्यक्ष, गिरणी कामगार संघर्ष समिती




हेही वाचा

गिरणी कामगारांच्या घरांसाठी आता अतिरिक्त जागा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा