Advertisement

दोस्ती बिल्डरला अटक करा, लॉयड्स इस्टेटच्या रहिवाशांची मागणी


दोस्ती बिल्डरला अटक करा, लॉयड्स इस्टेटच्या रहिवाशांची मागणी
SHARES

अॅण्टॉप हिल परिसरातील लॉयड्स इस्टेटच्या इमारत दुर्घटनेनंतर बुधवारी वडाळा येथील मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाच्या इमारतीसमोर येथील रहिवाशांनी अांदोलन केलं. दोस्ती बिल्डरच्या दिपक गरोडिया, किसन गरोडिया, राजेश शहा या तिघांना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी रहिवाशांनी केली. अटक न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला अाहे.


नेमकं प्रकरण काय ?

सोमवारी २५ जूनला पहाटे चारच्या सुमारास पाऊस कोसळत असताना अॅण्टॉप हिल भागातील लॉयड्स इस्टेट इमारतीची संरक्षक भिंत कोसळली.  त्यामुळे जमीन खचून पडलेल्या खड्ड्यात सुमारे १० ते १२ गाड्या अड़कल्या, सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे लॉयड्स इस्टेटमधील काही इमारतींना धोका निर्माण झाला. येथील नागरिकांना अापली घरे खाली करावी लागली. 




तक्रारींकडे पालिका, पोलिसांचं दुर्लक्ष

लॉयड्स इस्टेटसमोर ५० मजली इमारतीचा पाया खोदण्यासाठी सुरू असलेल्या कामामुळं ही दुर्घटना घडल्याचं नागरिकांनी सांगितलं. या इमारतीजवळ खोदकाम करण्यास लॉयड्स सोसायटीने वारंवार आक्षेप घेतला होता. तसेच रहिवाशांनी अॅण्टॉप हिल पोलिस ठाणे, मुंबई महापालिका वॉर्डाकडे तक्रारीही दाखल केल्या होत्या. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं रहिवाशांनी सांगितलं.


काम थांबवण्याचे अादेश 

दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या लॉयड्स इस्टेट, दोस्ती ब्लॉसम, कारनेशन, डिफोडिल्स या चारही इमारतीचं शिष्टमंडळ आणि पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाचे प्रमुख यांची या प्रकरणाबाबत चर्चा झाली. पालिका प्रशासनाने दोस्ती बिल्डरला बांधकामासाठी दिलेल्या सर्व परवानग्या रद्द केल्या अाहेत. तसंच जोपर्यंत या सर्व इमारतींना असलेला धोका पूर्णपणे टळत नाही तोपर्यंत हे बांधकाम थांबवण्यात यावं असे आदेशही पालिका प्रशासनाने दोस्ती बिल्डरला दिले आहेत.


दोस्ती बिल्डरला बांधकामासाठी दिलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात. तसंच जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अामचं आंदोलन सुरू राहील. ही इमारत संपूर्णपणं असुरक्षितच असून तिथ राहणारे काही नागरिक आपले जवळचे नातेवाईक, अथवा हॉटेलमध्ये वास्तव करत आहेत. एवढी मोठी दुर्घटना होऊनही पालिका प्रशासन दखल घेत नाही याचंच मला आश्चर्य वाटतं.
- भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार, काँग्रेस



हेही वाचा-

एल्फिन्स्टनचा नवा पूल ३० जूनपासून सेवेत

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट: कोळी भगिनींनो बिनधास्त वापरा थर्माकोल बॉक्स!


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा