Advertisement

एल्फिन्स्टनचा नवा पूल ३० जूनपासून सेवेत

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) शनिवार ३० जून रोजी प्रवाशांसाठी खुला करून देण्यात येणार आहे. हा पूल अरूंद असल्याने २३ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेला होता.

एल्फिन्स्टनचा नवा पूल ३० जूनपासून सेवेत
SHARES

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) शनिवार ३० जून रोजी प्रवाशांसाठी खुला करून देण्यात येणार आहे. हा पूल अरूंद असल्याने २८ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या जागी नवीन पूल उभारण्याचं काम हाती घेतलं होतं.


नवीन प्लॅटफाॅर्मवर नवा पूल

काही दिवसांपूर्वीच परळ स्थानकावरील नवीन प्लॅटफॉर्मचं उद्घाटन करण्यात आलं. त्यातच आता परळ आणि एल्फिन्स्टन रोडवरून जाणारा हा नवा १२ मीटर रुंदीचा पादचारी पूल येत्या ३० जूनपर्यंत सेवेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे परळ व एल्फिस्टनला जोडणाऱ्या जुन्या पुलावरील गर्दी काही प्रमाणात कमी होईल, असा अंदाज आहे. कल्याण दिशेकडे डाऊन मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र पूल उपलब्ध होणार असल्याने परळच्या जुन्या पुलावरील भार कमी होणार असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.


कधी बांधला होता पूल?

परळ-एल्फिन्स्टन स्थानकांना जोडणारा जुना पूल १९७२ मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाची लांबी ३२ मीटर असून रुंदी ५ मीटर आहे. नवीन पुलाच्या बांधकामाला २०१६ मध्ये मंजुरी मिळाली होती. पण या पुलाचं काम वेळेत हाती घेण्यात आलं नाही. तसं झालं असतं तर चेंगराचेंगरीची घटना टळली असती, अशी टीका पश्चिम रेल्वेवर झाली होती.


जलद बांधकाम

त्यानंतर या पुलासाठी पुन्हा निविदा काढण्यात आली. या निविदा प्रक्रियेनंतर एका दिवसातच ७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलं. जलद गतीने निविदा उघडून काम सुरू करण्याची ही रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना मानली जाते.


नवा पर्याय

एल्फिन्स्टन रोड स्थानक दुघर्टनेनंतर लष्कराच्या मदतीने कल्याण दिशेकडे एक ब्रिज बांधण्यात आला होता. या कामासाठी ८ कोटी ९ लाख रुपये खर्च करण्यात आले. जुन्या आणि आर्मी ब्रिजमधील हा पादचारी पूल प्रवाशांसाठी नवा पर्याय ठरणार आहे.हेही वाचा-

मध्य रेल्वेकडून ७५ स्थानकांचा पुन्हा आढावा, प्रवासी सुविधांवर विशेष लक्ष

गुड न्यूज! एसी लोकलच्या भाडेवाढीला स्थगितीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा