धारावीच्या पुनर्विकासासाठी नवा फॉर्म्युला

 Pali Hill
धारावीच्या पुनर्विकासासाठी नवा फॉर्म्युला

मुंबई – वर्षानुवर्षे रखडलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी आता धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी)ने नवा फाॅर्म्युला आणला आहे. त्यानुसार धारावीचा पुनर्विकास धारावीकराच्या सहभागातून करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती डीआरपीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई लाईव्हला दिली.

कसा आहे हा फॉर्म्युला?

- सेक्टर-1 वगळता 2,3 आणि 4 सेक्टरचे प्रत्येकी 3 सबसेक्टर केले

- 7 ते 10 हेक्टरचे एक सबहेक्टर

- सबसेक्टरमधील रहिवाशी-झोपडपट्टीवासीय सोसायट्या तयार करून बिल्डरांना आंमत्रित करतील

- 10 बिल्डरांची निवड करत त्यांचे प्रस्ताव सोसायट्यांकडून डीआरपीकडे पाठवले जातील

- प्रस्तावांची चाचणी करून त्यातून 3 बिल्डरांची निवड डीआरपी करेल

- निवडलेल्या बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकास मार्गी लावण्यात येईल.

या फाॅर्म्युल्याला सरकारनं हिरवा कंदिल दाखवल्याबरोबर याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून धारावीकरांना हा फाॅर्म्युला समजावून देत त्यांची मते जाणून घेण्यात येत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केल.

Loading Comments