Advertisement

लायसन्स फी माफ करा, मुंबईतील रेस्टाॅरंट मालकांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मुंबई महापालिका क्षेत्रात ६ महिने कालावधीसाठी लायसन्स फी माफ करण्यात यावी, अशी मागणी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) च्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

लायसन्स फी माफ करा, मुंबईतील रेस्टाॅरंट मालकांची मुख्यमंत्र्यांना विनंती
SHARES

लॉकडाऊनच्या काळात सुमारे ६ महिने रेस्टॉरंटस् बंद असल्याने मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. आता कुठे सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने यातून बाहेर येण्याकरीता मुंबई महापालिका क्षेत्रात ६ महिने कालावधीसाठी लायसन्स फी माफ करण्यात यावी, अशी मागणी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) च्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे केली.

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) च्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संघटनेच्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली.  

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीवेळी कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी, सरचिटणीस सुकेश शेट्टी, उपाध्यक्ष विजय शेट्टी, प्रसाद शेट्टी, सुभाष सुवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- देशातील सर्व टोलनाके हटवणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

लॉकडाऊननंतर कोरोना (coronavirus) नियंत्रणविषयक नियमांचं पालन करुन रेस्टॉरंटस् सुरु करण्यासाठी संमती दिल्याबद्दल संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मात्र कोरोना संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंटस्‌चं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सुमारे ६ महिने रेस्टॉरंटस् बंद असल्याने मुंबई महापालिका क्षेत्रात ६ महिने कालावधीसाठी लायसन्स फी माफ करण्यात यावी. 

तसंच एक्साईज लायसन्स फी ४ सुलभ हप्त्यांमध्ये भरण्यास संमती मिळावी, अशा मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत सादर करण्यात आलं. संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला होता. यावेळी त्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचं पालन करावं, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. 

(Restaurant's association urges CM Thackeray to waive BMC licence fees for the industry)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा