Advertisement

मुंबईतील लाॅकडाऊनवर अजून निर्णय नाही- नवाब मलिक

मुंबईत लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

मुंबईतील लाॅकडाऊनवर अजून निर्णय नाही- नवाब मलिक
(File Image)
SHARES

मुंबईत (mumbai) कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने एका बाजूला लाॅकडाऊन लावण्याची चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला लाॅकडाऊन ऐवजी रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लावणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये हळूहळू भीतीचं वातावरण पसरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मात्र लाॅकडाऊनवर अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, असं सांगितलं.

मुंबईत लॉकडाऊन करण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवाब मलिक (nawab malik) यांनी दिला आहे. 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही वेळापूर्वीच मुंबईत संचारबंदी लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचं म्हटलं आहे. बाजारांमध्ये मोठी गर्दी उसळत असल्याने ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते, असे बाजार दुसरीकडे हलवण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  

हेही वाचा- मुंबईत संचारबंदी लागू करण्याचे महापौरांचे संकेत

दादर येथील भाजी व फूल बाजार मध्यवर्ती ठिकाणी असल्याने इथं खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे हे दोन्ही बाजार बीकेसीतील एमएमआरडीए व सायन येथील सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहेत. बीकेसी व सोमय्या मैदानात दोन्हीकडे भाजी व फूल विक्रेते बसतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा शहरात लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व मुंबईकरांनी कोरोना नियम पाळणं येणं गरजेचं आहे, असं आवाहनही महापौर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) यांनी केलं आहे.

त्याआधी मुंबईसह राज्यात कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मंगळवारची आकडेवारी पाहिली तर दिवसाला जवळपास २ हजार नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तरीही स्थिती बिकट आहे, असं म्हणता येणार नाही. पण कठोर निर्बंधांची आवश्यकता आहे, असं प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं होतं.

राज्यभरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने औरंगाबाद, नागपूर, अमरावतीसह काही शहरांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू आहे. पण, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, कडक निर्बंध लावले जातील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा