Advertisement

राज्यातील हॉटेल्स आता १२ वाजेपर्यंत राहणार सुरू; सरकारची मार्गदर्शक सूचना जाहीर

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.

राज्यातील हॉटेल्स आता १२ वाजेपर्यंत राहणार सुरू; सरकारची मार्गदर्शक सूचना जाहीर
SHARES

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. त्यानुसार, आता राज्यातील हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना जाही करण्यात आल्या आहेत.

उपाहारगृहे आणि दुकाने यांच्या वेळा वाढवून देण्याची सातत्यानं मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेता राज्य सरकारनं राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शिवाय, इतर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. 

राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहेही सुरू करण्यात येणार आहेत. अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले.

मार्गदर्शक सुचना :

राज्यातील रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

इतर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

दुकान, रेस्टॉरंटमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेले आवश्यक आहे

फेस मास्क अनिवार्य आहे

सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा