Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९७.८५ टक्के पाणीसाठा

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १४ लाख १६ हजार २१७ दशलक्ष म्हणजे ९७.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९७.८५ टक्के पाणीसाठा
SHARES

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांमध्ये पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं या तलावांमध्ये १४ लाख १६ हजार २१७ दशलक्ष म्हणजे ९७.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्याता आहे. त्यामुळं मुंबईकरांना असलेली पाण्याची चिंता आता मिटण्याची शक्यात आहे.

तलाव क्षेत्रांमध्ये पाऊस

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस झाला असून तलावांमध्ये तब्बल १४ लाख १६ हजार २१७ दशलक्ष म्हणजेच ९७.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत. परिणामी, पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा होऊ शकेल, असा विश्वास जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

इतका पाणीपुरवठा

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ तलावांमधून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, काही महिन्यांपूर्वी या तलावांमधील पाणीसाठा प्रचंड कमी झाला होता. त्यामुळं मुंबईकरांवर पाणी संकट येण्याची शक्यता होती. मात्र, मागील २-३ दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं सातही तलावांमध्ये तब्बल १४ लाख १६ हजार २१७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

ओव्हर फ्लो

या ७ तलावांपैकी मोडक सागर, तानसा, विहार आणि तुळशी तलाव मुसळधार पावसामुळं यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. तसंच, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होणअयाची शक्यता आहे.

तलांमधील पाणीसाठा

  • अप्पर वैतरणा - ६०३.३०
  • मध्य वैतरणा - २८४.५०
  • भातसा - १४१.२७
  • मोडक सागर - १६३.१५
  • तानसा - १२८.६१
  • विहार - ८०.६२
  • तुळशी - १३९.६०



हेही वाचा -

पावसानं गाठला ३ हजार मिमी मोठा पल्ला

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली पदाची शपथ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा