Advertisement

रस्ते अपघातात दिवसाला जात आहेत २६७ जणांचा बळी

भरधाव वेगासोबतच मोबाइलवर बोलणे, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, उलट दिशेने, बेशिस्तपणे वाहन चालविणे, भारक्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे अशी विविध कारणे रस्ते अपघातास कारणीभूत ठरत आहेत.

रस्ते अपघातात दिवसाला जात आहेत २६७ जणांचा बळी
SHARES

देशात गटांमधील हाणामारी, दंगल किंवा नक्षलवादी-दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात डोके दुखी ठरत आहे. देशात वर्षभरात ९७,५८८ जणांना नाहक जिवास मुकावे लागले आहे. इतकेच नव्हे, तर याच भरधाव वेगामुळे दररोज २६७ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.


 देशात मोठ्या प्रामाणात रस्त्यांची काम सुरू असली. तरी रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी पडताना दिसतं आहे. मात्र यात खराब रस्त्यांबरोबर वाहन चालकांचा निष्काळजी पणा ही तितकाचं महत्वाचा आहे.  भरधाव वेगासोबतच मोबाइलवर बोलणे, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, उलट दिशेने, बेशिस्तपणे वाहन चालविणे, भारक्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे अशी विविध कारणे रस्ते अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे अहवालातून उघडकीस आले आहे. २०१७, तसेच २०१८ या दोन वर्षांची तुलना केल्यास २०१७ मध्ये भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे ३,२७,४४८ अपघात घडले होते. यात ९८,६१३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३,४३,०८३ जण जखमी झाले होते. २०१८ मध्ये भरधाव वेगामुळे झालेल्या ३,१०,६१६ अपघातांमध्ये ९७,५८८ जणांचा मृत्यू झाला असून, ३,१६,४२१ जण जखमी झाले. याचाच अर्थ वेगामुळे २०१८ मध्ये दररोज सरासरी २६७ जणांना नाहक जीव गमवावा लागला आहे.


देशात २०१८ मध्ये देशात झालेल्या रस्ते अपघातांतील मृत्यूंपैकी ५५,३३६ मृत्यू हे दुचाकी अपघातात झाले आहेत, तर कार, टॅक्सी, व्हॅन आदी वाहनांमुळे झालेल्या अपघातांत २५,११५ जणांचा मृत्यू झाला. ट्रक आणि इतर अवजड वाहनांमुळे १५,१५०, इलेक्ट्रिक रिक्षासह इतर वाहनांच्या अपघातांमुळे ११,१०९, बसमुळे ८,१६४, रिक्षांमुळे ६,६२९, सायकलमुळे ३,६७३, तर इतर कारणांमुळे ३,५८५ जणांना जिवास मुकावे लागले. २०१७ मध्ये भरधाव वेग वगळता अन्य कारणांमुळे घडलेल्या ७९,३९३ अपघातात २९,९९९ जणांचा मृत्यू झला असून, २०१८ मध्ये १,०६,१५३ अपघातांत ३५,६२५ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा सुधारणेकडे लक्ष द्यावे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा