Advertisement

रेल्वेच्या जवानाने वाचवले तरुणीचे प्राण

दादर रेल्वे स्थानवकवर लोकल ट्रेनमधून उतरताना एका तरुणीचा तोल जाऊन ती धावत्या रेल्वेतून पडली. ट्रेनखाली जाणाऱ्या या तरुणीचा घटनास्थळी तैनात असलेल्या रेल्वे पोलिस शिवाजी सोपान केदार यांनी जीव वाचवला. ही घटना स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली.

रेल्वेच्या जवानाने वाचवले तरुणीचे प्राण
SHARES

दादर रेल्वे स्थानवकवर लोकल ट्रेनमधून उतरताना एका तरुणीचा तोल जाऊन ती धावत्या रेल्वेतून पडली. ट्रेनखाली जाणाऱ्या या तरुणीचा घटनास्थळी तैनात असलेल्या रेल्वे पोलिस शिवाजी सोपान केदार यांनी जीव वाचवला. ही घटना स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली.

कौतुकास्पद कामगिरी

२ फेब्रुवारी रोजी दादरच्या फलाट क्रमांक ३ आणि ४ वर रेल्वे पोलिस शिपाई शिवाजी केदार हे गस्तीसाठी तैनात होते. त्यावेळी रात्री ९:४२ वाजताची सीएसएमटी लोकल फलाट क्रमांक ३ वर आली. या लोकलमधून एक तरूणी खाली उतरत असताना, लोकल सुरू झाली. चालत्या लोकलमधून उतरता न आल्याने तरुणीचा तोल गेला आणि ती फलाटावर पडली. सदर तरुणी फलाट आणि लोकलमधील मोकळ्या जागेत पडणार, तोच रेल्वे पोलिस शिपाई शिवाजी केदार यांनी तिला बाजूला ओढल्याने तिचा जीव वाचला. हा संपूर्ण थरार रेल्वे फलाटावरील सीसीटिव्हीत कैद झाला आहे. शिवाजी केदार यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे रेल्वे पोलिस आयुक्तांनी त्यांचा सन्मान केला आहे.

हेही वाचा -

कर थकवणाऱ्यांवर पालिका करणार कारवाई

मुंबई पोलिसांचं मिशन 'पोट आवरा'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा