आरपीएफच्या जवानाने वाचवले तरुणाचे प्राण


SHARE

शनिवारी संध्याकाळी आरपीएफ जवानाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. त्या तरुणाचं नाव रवी बालू (25) असं आहे. हा तरुण पनवेल-नांदेड एक्स्प्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा तोल गेल्याने प्लॅटफॉर्मवर घसरत गेला. दरम्यान आरपीएफ जवान विनोद शिंदे यांनी तातडीने त्या तरुणाजवळ आले आणि त्या तरुणाला वाचवलं.


संपूर्ण प्रकार

शनिवारी संध्याकाळी पनवेल-नांदेड एक्स्प्रेसमध्ये चढताना रवीचा तोल गेल्याने तो प्लॅटफॉर्मवर घसरत गेला. दरम्यान एका प्रवाशाचं लक्ष वेधतं आणि ते मदतीसाठी धावून जातात. मात्र यश येत नाही. याचदरम्यान कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान विनोद शिंदे सतर्कता दाखवत तातडीने त्या तरुणाच्या मदतीसाठी धावतात आणि रवी बालूचा जीव वाचवतात.

ही ट्रेन प्रतितास 30 किमी वेगाने धावत होती. मात्र यामध्ये रवीला कोणतीही दुखापत झालेली नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या