Advertisement

लोकलच्या पटऱ्यांवरील कचरा ठरतोय डोकेदुखी, आरपीएफ पोलिसांकडून कचरा न टाकण्याचं आवाहन

हातातील नको असलेली वस्तू ते सहजच लोकलच्या स्थानकावर किंवा पटऱ्यांवर टाकून मोठे होतात. दिवसेंदिवस हा पटऱ्यांवरील कचरा आता रेल्वे प्रशासनाची मोठी डोकेे दुखी ठरू लागला आहे.

लोकलच्या पटऱ्यांवरील कचरा ठरतोय डोकेदुखी, आरपीएफ पोलिसांकडून कचरा न टाकण्याचं आवाहन
SHARES
मुंबईच्या लोकलवरील पटऱ्यांवरील घाण हा रेल्वे प्रशासनाचा चिंतेचा विषय ठरत आहे. वारंवार हा कचरा साफ करण्यासाठी उपाय योजना करूनही कचरा कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच पावसाळ्यात लोकलचे नाले तुंबुन पाणी पटरीवर साचते. त्यामुळेच रेल्वेजवळील नागरिक वस्तीत आणि स्थानक परिसरात आरपीएफकडून पटरीवर कचरा न टाकण्याचे आवाहन केले जात आहे.


लोकलचा वेग मंदावतो

मुंबईच्या तिन्ही मार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. त्यात बेशिस्त आणि घाणीचे साम्राज्य पसरवणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी नाही. हातातील नको असलेली वस्तू ते सहजच लोकलच्या स्थानकावर किंवा पटऱ्यांवर टाकतात. दिवसेंदिवस हा पटऱ्यांवरील कचरा आता रेल्वे प्रशासनाची मोठी डोकेेदुखी ठरू लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई केली तरी तिसऱ्याच दिवशी पुन्हा त्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला असतो. याच कचऱ्यामुळे नाले तुंबल्याने पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते लोकलच्या पटऱ्यांवर येऊन पोहचते. परिणामी लोकलचा वेगही मंदावतो.


नाल्यांची साफसफाई

त्यामुळेच आता रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पुन्हा लोकल स्थानक परिसरातील नाल्यांची साफसफाई सुरू केली असून नागरिकांनाही कचरा न टाकण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी आरपीएफचे पोलिस लोकलजवळील वस्ती आणि स्थानक परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेत कचरा न टाकण्याचे आवाहन करत असल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्याने
सांगितले.



हेही वाचा-

एअर इंडियाची मुंबई-न्यूयाॅर्क सेवा बंद

सायबर चोरट्यांनी लोकलच्या मोटरमनला दहा लाखाला गंडवलं




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा