Advertisement

एअर इंडियाची मुंबई-न्यूयाॅर्क सेवा बंद

मुंबई ते न्यूयाॅर्क अशी सेवा सुरू होऊन ६ महिने होत नाही, तोच एअर इंडियाने ही सेवा बंद केली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये एअर इंडियाने ही सेवा सुरू केली होती. परंतु या मार्गावरील तिकीट बुकींग बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला.

एअर इंडियाची मुंबई-न्यूयाॅर्क सेवा बंद
SHARES

मुंबई ते न्यूयाॅर्क अशी सेवा सुरू होऊन ६ महिने होत नाही, तोच एअर इंडियाने ही सेवा बंद केली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये एअर इंडियाने ही सेवा सुरू केली होती. परंतु पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे या मार्गावरील तिकीट बुकींग बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. या मार्गाचा अंतिम निर्णय १५ मे रोजी होणाऱ्या बैठकीत केला जाईल. 

भारत आणि अमेरिकेदरम्यान नाॅन स्टाॅप विमान सेवा पुरवणारी एअर इंडिया सर्वात मोठी आॅपरेटर आहे. परंतु एअर इंडियाने ही सेवा बंद केल्याने कंपनीला दररोज ६ कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. एअर इंडियाचं फ्लाइट न्यूयाॅर्क, नेवार्क, शिकागो, वाॅशिंग्टन आणि सॅन फ्रांसिस्कोसाठी १४ ते १६ तास नाॅन स्टाॅप जातं. परंतु पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झाल्यापासून या विमानांना ओमान आणि ईराणच्या हवाई क्षेत्रातून पाठवलं जात आहे.

एअर इंडियाने मुंबई-न्यूयाॅर्क जेएफके मार्गावरील विमानसेवा १० मार्च पासून अनिश्चित काळासाठी बंद केली होती. आठवड्यातून ३ वेळेस ही सेवा पुरवण्यात येत होती. ही सेवा २ जूनपासून पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतु २०२० च्या फेब्रुवारीपर्यंत या सेवेसाठी तिकीटांचं बुकींग उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही.  

याच दरम्यान डेल्डाने २४ डिसेंबरपासून दैनिक सेवेसाठी या मार्गावरील तिकीट बुकींग सुरू केलं आहे. डेल्टा बोइंग 777-200LR विमानाची सेवा या मार्गावर सुरू करणार आहे. ज्यात सीटबॅक मनोरंजन, वायफाय कनेक्टिव्हिटी इ. सेवा मिळेल.हेही वाचा-

जेट एअरवेजच्या सीएफओ यांचा राजीनामा

'जेट बंद झाल्यानं आमच्या स्वप्नांचं उड्डाण कोसळलं'Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा