पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली प्रवाशाची बॅग

  Kurla
  पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडली प्रवाशाची बॅग
  मुंबई  -  

  महत्त्वाची कागदपत्रे आणि 50 हजारांची रोकड असलेली बॅग एक प्रवासी लोकल ट्रेनमध्येच विसरला होता. मात्र कुर्ला रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या प्रवाशाला त्याची हरवलेली बॅग परत मिळाली आहे. उल्हासनगर येथे राहणारे हरिश्चंद्र कांबळे मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास उल्हासनगर येथून दिवा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यानुसार त्यांनी सीएसटी लोकल पकडली. मात्र दिवा येथे उतरल्यानंतर आपल्याकडील बॅग ट्रेनमध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सदर बॅगेची माहिती दिली. ही माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ लोकलममध्ये जाऊन बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर प्रवाशाची ओळख पटवून बॅग परत करण्यात आली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.