
भायखळ्यातील (Byculla) राणीची बाग (Rani Baugh) म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात शक्ती नावाच्या वाघाचा (Tigre) संशयास्पद मृत्यू होण्यापूर्वी त्याचा बछडा रुद्र या वाघाचा मृत्यू झाला आहे.
रुद्र हा शक्ती आणि करिश्मा यांचा 3 वर्षाचा बछडा होता. 29 ऑक्टोबर 2025 रोजी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर रुद्र वाघाच्या मृत्यूची बातमी समाजमाध्यमातून समोर आल्याने राणी बाग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दुसरीकडे राणी बाग प्रशासनाचे अधिकारी वाघांच्या मृत्यूबाबत लपवाछपवी का करत आहेत? असा संतप्त सवाल प्राणीप्रेमी करत आहेत.
राणी बागेतील शक्ती वाघाच्या संशयास्पद मृत्यूनंतर (Death) प्रशासनावर टीकेची आगडोंब उठलेली असताना प्राणीप्रेमींनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाल्याची टीका केली होती.
आता शक्ती वाघाच्या बछड्याच्याही मृत्यू 29 ऑक्टोबरला झाल्याची माहिती समोर आहे. रुद्र हा केवळ 3 वर्षांचा बछडा होता. त्याला जन्मापासूनच आजार असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र, रुद्र वाघाच्या आजाराबाबतची माहिती का लपवण्यात आली, असा संतप्त सवाल प्राणीप्रेमी करत आहेत.
हेही वाचा
