
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या HBT पॉलिक्लिनिक्ससाठी तज्ज्ञ डॉक्टरांची भरती आउटसोर्सिंग पद्धतीने सुरू केली आहे. या पद्धतीनुसार, डॉक्टरांना आठवड्यातील एका भेटीसाठी किमान 1,500 ते जास्तीत जास्त 4,000 मानधन दिले जाईल. तज्ज्ञांकडून अर्ज मागवण्यासाठी BMC ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
HBT पॉलिक्लिनिक्स या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमासोबत सुरू करण्यात आल्या.
‘आपला दवाखाना’ येथे येणाऱ्या रुग्णांना तपासणीनंतर संबंधित पॉलिक्लिनिक्समध्ये डॉक्टरांकडे पाठवले जाते. सध्या मुंबईत अशा 26 पॉलिक्लिनिक्स आहेत, परंतु तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनेक पदांवर रिक्तता आहे. या रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी करार पद्धतीवर डॉक्टरांचे अर्ज मागवले जात असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्ष शाह यांनी दिली.
ENT तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांकडून मागवले आहेत.
अर्जदारांकडे पदवीसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल काउंन्सिलमध्ये नोंदणी, इतर अतिरिक्त पात्रता आणि त्यांचे नूतनीकरण अनिवार्य आहे. मूलभूत संगणक ज्ञानही आवश्यक आहे.
सुरुवातीची नियुक्ती 179 दिवसांसाठी असेल आणि समाधानकारक कामगिरी असल्यास कराराचा कालावधी वाढवला जाईल. प्रत्येक तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एक दिवस सेवा देतील.
प्रत्येक भेटीसाठी किमान पाच रुग्ण तपासल्यास 1,500 मानधन दिले जाईल. पाच रुग्णांनंतर प्रत्येक अतिरिक्त रुग्णासाठी 250 मानधन मिळेल. अशा प्रकारे, एका भेटीसाठी डॉक्टराला कमाल 4,000 आणि महिन्याला किमान 16,000 मानधन मिळू शकते.
माजी नगरसेविका रुकसाना सिद्दीकी यांनी या प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल चिंता व्यक्त केली. सरकारी वैद्यकीय कॉलेजांमधील अनेक तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात हजेरी लावत असताना खाजगी प्रॅक्टिसही करतात, असे त्यांनी नमूद केले.
तसेच पॉलिक्लिनिक्समध्ये तज्ज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष रुग्णांना सेवा देत आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी कोणतीही मॉनिटरिंग व्यवस्था नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा
