Advertisement

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना नियमावलीचा विसर


बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना नियमावलीचा विसर
SHARES

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन सतत प्रयत्न करत आहे. शिवाय, राज्य सरकारनंही नियमावली आखून दिली आहे. मात्र ही नियमावली पायदळी तुडवत मंगळवारी ५ दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. बेन्जो, ढोल-ताशे यांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकांत अंतर नियम आणि मास्क वापराचे भान न राहिल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

मुख्य रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असल्यानं अनेक ठिकाणी गृहसंस्था, चाळीच्या आवारात तसेच अंतर्गत रस्त्यांवर मिरवणुका निघाल्या. कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासाठी सरकारी यंत्रणा सातत्याने नागरिकांना आवाहन करत आहेत. गणेशोत्सवानिमित्त गर्दी होऊन संसर्ग वाढीस लागू नये यासाठी महापालिकेने विशेष नियमावली जाहीर केली होती.

त्यानुसार मिरवणुका, वाजंत्री यांना बंदी घालण्यात आली होती. शिवाय घरगुती गणपती असेल तर पाच आणि सार्वजनिक गणपती असेल तर केवळ दहाच जणांना विसर्जनस्थळी जाण्याची परवानगी आहे. या सर्व नियमांना गणेश भक्तांनी मंगळवारी हरताळ फासला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा