दुबे रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात

 Dahisar
दुबे रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात
दुबे रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात
दुबे रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात
दुबे रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात
दुबे रोडच्या रुंदीकरणाला सुरुवात
See all

दहिसर - दहिसर पूर्वेकडील एसएन दुबे रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात झालीये. हा रस्ता अरुंद असल्यानं इथे वाहनचालक आणि पादचाऱ्यांनाही वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. 29 नोव्हेंबरला मनपाच्या आर उत्तर विभागानं इथल्या दुकानदारांना दुकानं मागे घेण्याची नोटिस बजावली होती. मात्र सुरुवातीला दुकानदारांनी त्याला विरोध केला. नंतर त्यांनी दुकानं तोडून मागे घेतली. त्यामुळे काही दिवसांतच इथली वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे.

Loading Comments