सफाई कामगरांचा चेक वटलाच नाही

 Kandivali
सफाई कामगरांचा चेक वटलाच नाही

कांदिवली - कांदिवलीच्या आर दक्षिण पालिकेच्या सफाई कामगारांना कंत्राटदरांने दिलेला दिवाळीचा बोनसचा चेक वटलाच नाही. त्यामुळे शुक्रवारी सफाई कामगारांनी आर दक्षिण पालिका विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. सफाई कामगरांना प्रत्येकी 9 हजार रुपये बोनसचा चेक दिला होता. कामगारांनी चेक बॅंकेत जमा करताच ज्या एक्सिस बॅंकेच्या नावे चेक दिला होता, त्यात पैसेच नसल्याचं बॅंकेकडून सांगण्यात आलं. 'शुक्रवारी या कामगारांनी पालिकेवर धडक देताच येत्या दोन दिवसात रोखीने पैसे मिळतील असं आश्वासन घनकचरा व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचं' सफाई कामगार सी. पेरूमल यांनी सांगितलं.

Loading Comments