Advertisement

सहारनपूर हिंसापीडितांनी सांगितले अनुभव


सहारनपूर हिंसापीडितांनी सांगितले अनुभव
SHARES

सहारनपूर येथे दलितांवर अत्याचार करणाऱ्या तसेच बुलढाणा जिल्ह्यातील दलित महिलेची नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना लवकरात-लवकर शिक्षा व्हावी यासाठी 12 जून रोजी महाराष्ट्रातील विविध समाजातील संघटनांनी एकत्र येऊन ठिक-ठिकाणी निदर्शने केली. राज्यपालांना यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. आपल्यावर झालेले अत्याचार आणि वेदनांची जाणीव समाजातील सर्व संघटनांना करून देण्यासाठी सहारनपूर येथील पीडित 13 जून रोजी मुंबईत आले होते. यावेळी प्रभादेवीच्या भुपेश गुप्ता भवन येथे मंगळवारी रात्री काही संघटनांनी एकत्र येऊन या पीडितांशी खास संवाद बैठक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये या घटनेचा अभ्यास करणारे तसेच अत्याचाराला बळी पडलेले अनेक जण सहभागी झाले होते.

बैल चोरल्याचा खोटा आळ घालत समाजकंटकांनी एका दलित महिलेची नग्न धिंड काढण्यात आलेली घटना 2 मे रोजी बुलढाण्यात घडली. या घटनेची माहिती मिळताच 9 मे रोजी बुलडाण्यात जाऊन त्या महिलेची भेट घेतली असता अत्यंत वाईट वाटले. या घटनेचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात खैरलांजी हत्याकांड होता होता राहीला, असे वाटल्याचे सामाजिक कार्यकर्त्या शारदा नवले म्हणाल्या.

यावेळी सहारनपूरच्या अत्याचाराचे पीडित अग्नी भास्कर यांनी देखील त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची घटना काय आणि कशी होती यावर भाष्य करत आपली व्यथा मांडली. यावेळी भास्कर यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर सडकून टीका केली. तसेच योगी सरकार जातीवादी असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले आम्ही योगी सरकार येण्याच्या आधीपासूनच बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या मूर्ती घडवण्याचे काम करतो. तो आमचा व्यवसाय आहे. आमचा कारखाना बंद व्हावा या करता योगी सरकार जोरजबरदस्ती करत आहे. तो बंद न केल्यामुळे त्यांनी माझा हात तोडला. जनावरांना मारझोड केली त्यामध्ये काही जनावरे मृत्यू पावली आहेत. मुळात कारखान्याची जागा आणि त्यामधील सर्व कारागिरी आमचे आहेत कुणालाही आमचा यापूर्वी आता आणि यापुढेही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो असे ते म्हणाले. योगी सरकार जुलमी सरकार आहे. असे म्हणत अग्नी भास्कर भरकार्यक्रमात ढसा-ढसा रडू लागले. या कार्यक्रमात मुंबईतील अनेक संघटना तसेच यावर अभ्यास करणारे सामाजित कार्यकर्ते पीडित पत्रकार असे अनेकजण सहभागी झाले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा